पृष्ठे

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

शाब्बासकी

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना कर्तव्य म्हणून केलेल्या कामाची शेतकरी खातेदार दखल घेतात, कौतुक करतात...
हे प्रेरणादायी आहे. 
चांगल्या कामासाठी ऊर्जा देणारे आहे...
धन्यवाद...



*मा. रोहीत पाठकसाहेब*,

नमस्कार,

घरपोच मोफत सुधारित कृषक सातबारा वाटप या कार्यक्रमाचे 
निमंत्रण आम्हाला मिळाले.आपले आभारी आहोत.

शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी तो खूपच लाभदायक आहे.

आपण स्वतः वर्षभर शासनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उत्स्फूर्तपणे *नेतृत्व* करता व ते यशस्वी करता, याचे आम्ही साक्षीदार आहोत. हा उपक्रम सुद्धा आपण त्याच जोमाने यशस्वी कराल याबद्दल खात्री आहे.

आम्ही सध्या ठाणे येथे आहोत अन्यथा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो असतो. तथापि, आपला हा कार्यक्रम यशस्वी होवो अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. 

या कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी आमच्याकडून काही मदत आवश्यक असेल तर  आम्ही निश्चितच करु.

*शासनाच्या व आपल्या या समर्पित सेवेसाठी अभिनंदन! आभार!!*

*उदय विठ्ठल साळवी व कुटुंबीय*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा