पृष्ठे

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६

न्यायप्रविष्ट

न्यायप्रविष्ट प्रकरणात महसूल अधिकारी यांनी निर्णय घेऊ नये असे मा. मुख्य सचिव यांचे एक पत्र आहे. सदर पत्र मान. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निर्गमित केले आहे. 
लाखो प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यातील दोन्ही बाजूंकडे काही ना काही सबळ पुरावे/ GR/ नियम/ कायदे आहेत. 
त्यातल्या त्यात जे योग्य, पटणारे, हितकारक वाटते तेच न्यायालय करत असते. 



सातबारा हा मालकी हक्काचा निर्विवाद पुरावा नाही. 

त्यामुळे फेरफार मंजूर/ नामंजूर करण्याने फारसा कायदेशीर परिणाम होत नाही. 

तथापि, शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरते. 


त्यामुळे आपले कामकाज २+२= ४ असे नसते. 
3 किंवा 5 पण असू शकते. 


अनेक GR संदिग्ध असतात. 
५५ पानांचे मार्गदर्शन असते. वाचून शेवटी काय करायचे ते कळतच नाही. 
उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक 

😀😀😀
म्हणूनच legal, logical and moral यातील 2 बाबी सरस असतील त्याप्रमाणे काम करणे उचित ठरते. 


दोन्ही दगडांवर हात ठेवून वाटचाल करणारा तात्या. 
🤩

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

आस हव्यास आणि ध्यास

हवेपणाच्या तीन अवस्था आहेत.  एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास.
 आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. 
 हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते.
 आणि ध्यासामध्ये त्या वस्तू शिवाय इतर काहीच सुचत नाही.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर