पृष्ठे

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

शिक्षण आणि राजकारण

शालेय शिक्षण हा अनेक गुणांपैकी एक गुण आहे. नेते शिकलेले असावेत ही अपेक्षा रास्त आहे. 

नेता , मंत्री होण्यासाठी इतर अनेक गोष्टी आवश्यक असतात. 

अल्प शिक्षित नेत्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. 
आणि उच्च शिक्षित नेत्यांची खराब कामगिरी देखील झाली आहे. 

त्यामुळे, शिक्षण आणि राजकारण याचा संबंध मर्यादित आहे.

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

गुरुजी teacher

एखाद्याला सक्तीने गुलाम करता येते पण सक्तीने स्वतंत्र करता येत नाही. 

सक्तीने स्वतंत्र केले जात असेल तर गुणवत्तेच्या दृष्टीने ते ' लादले ' या प्रकारात मोडते.  

प्रबोधनाच्या सर्व टप्प्यात मार्गदर्शन करत रहावे, ज्याला  त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. 

Teacher is one who...
Knows the way
Goes the way
Shows the way! 

That's enough... 
🥰

जय हिंद

अजूनही मी लहानच आहे...

आपल्याला दिलेलं, मिळालेलं कोणतंही लहान मोठं काम नीट करणं, वेळेत करणं ही देशभक्तीच आहे! 

जय हिंद ... 🇮🇳

नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग, जय हिंद, जय हिंद, जय हिंद ... 

रस्ते पे चलूंगा न डर-डर के चाहे मुझे जीना पड़े मर-मर के मंज़िल से पहले ना लूंगा कहीं दम आगे ही आगे बढ़ाउंगा कदम दाहिने बाएं दाहिने बाएं, थम! नन्हा ...

 धूप में पसीना बहाउंगा जहाँ हरे-भरे खेत लहराएंगे वहाँ धरती पे फ़ाके न पाएंगे जनम आगे ही आगे ... 

नया है ज़माना मेरी नई है डगर देश को बनाउंगा मशीनों का नगर भारत किसी से न रहेगा कम आगे ही आगे ...

 बड़ा हो के देश का सितारा बनूंगा दुनिया की आँखों का तारा बनूंगा रखूँगा ऊंचा तिरंगा हरदम आगे ही आगे ...

 शांति कि नगरी है मेरा ये वतन सबको सिखाऊंगा प्यार का चलन दुनिया में गिरने न दूंगा कहीं बम आगे ही आगे ...

चित्रपट / Film: सन ऑफ इंडिया-(Son of India)

संगीतकार / Music Director: नौशाद अली-(Naushad)

गीतकार / Lyricist: शकील बदायुनी-(Shakeel Badayuni)
गायक / Singer(s): chorus, Shanti Mathur

सबका साथ

सबका साथ !
सबका विकास!!
सबका विश्वास!!!
सबका प्रयास!!!! 
मा. पंतप्रधान,  श्री. नरेंद्र मोदी
🙏🇮🇳...जय हिंद... 🇮🇳🙏

" साहुकार (व्यापारी) हे तो राज्याचे भूषण"

" साहुकार (व्यापारी) हे तो राज्याचे भूषण" 
अगदी खरंय...
आज बाजारपेठा उत्साहाने सजलेल्या पहायला मिळाल्या, खूप छान वाटलं. 
व्यापारी हा बहुतांशी लुटणारा दाखवला जातो; टीकेचा धनी असतो.
 जे वस्तुतः खरे नाही. 
अनेक समस्या, धोके, स्पर्धा व्यापारात असते. 
मागील अडीच वर्षांत काय काय म्हणून प्रसंग आले असतील ? 
यातून बाहेर येण्याची शक्ती आणि सद्गुणी युक्ती व्यापारी बांधवांना मिळो ही सदिच्छा.!
कमावण्याची व खर्च करण्याची इच्छा तसेच क्षमता वाढवणे हेच सर्वहिताचे आहे. 
अर्थात आरोग्याचे सर्व नियम पाळून...

|| रक्षाबंधनाविषयी दोन शब्द ||रक्षाबंधनात असं गृहीत धरलेलं आहे की मुलगी अबला असल्याने भावानं तिचं संरक्षण करायचं. आता या धारणा काही प्रागतिक म्हणता येणार नाहीत. पण एवढंच खरं नाहीए. काळानुसार धारणा बदलत जात असतात. अलिकडिल काळात मी जे पाहतोय त्यात मला 'संरक्षण' या भावनेचा प्राधान्यक्रम ढासळतो आहे, असे दिसते. हा आणि भाउबीज दोन्ही सण हे मुख्यत: भावा-बहिणीच्या प्रेमाची प्रतिकं बनताहेत. हळूहळू का होइना ही प्रक्रिया घडते आहे. कर्मकांड नि सण-उत्सव या बाबतीत या गोष्टी नेहमीच घडतात. ज्यासाठी ते कर्मकांड अगोदर निर्माण झालेले असते तो आशय मागे पडून नवा आशय त्यात भरला जात असतो. (हा बदल प्रत्येक वेळी चांगल्या दिशेनेच होइल असं मात्र सांगता येत नाही.) याची किती तरी उदाहरणे देता येतील. एक उदाहरण देवाला नारळ फोडण्याचे देता येइल. काही अभ्यासकांच्या मते ते नरबळीचं प्रतिक आहे. त्या नारळाला डोळे असतात. त्याला शेंडी असते. ती विशिष्ट दिशेला असावी लागते. आणि त्याची 'कवटी' आपण फोडतो. कदाचित खरोखरच नरबळीपासून नारळ फोडण्याची प्रथा उत्क्रांत झालेली असू शकते. पण आज कोणाला त्या मूळ धारणेची आठवण सुद्धा नाही. मुख्य म्हणजे नरबळी ते नारळ हा प्रवास तर विधायकच म्हणावा लागेल. सांगायचा मुद्दा असा की, जोवर एखादे कर्मकांड किंवा सण-उत्सव हे विघातक ठरत नाही तोवर त्यास विरोध करू नये, असे माझे मत आहे. कित्येक सण म्हणा, कर्मकांडं म्हणा ही फार वेगळ्या प्रकारची असतात. ते एक प्रकारचे 'भावकाव्य' असते. रक्षाबंधन तर नक्कीच तसे आहे. ते नष्ट करून उगीच मानवी जीवनात कोरडेपणा आणू नये. ते अधिक सुंदर, अधिक उन्नत कसे करता येइल ते पहावे. प्राध्यापक - श्री. संतोष शेलार

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

जळणार्‍या निखारयाच तापमान एखाद्या शेकोटी प्रमाणे निश्चित असत...
बसणाऱ्यानं शेकोटी पासून किती अंतरावर बसायच यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. .
ऊब हवी की चटके हे ज्याच त्याने ठरवायचे. ..
#vapu वपु काळे #vapurza