पृष्ठे

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

अंतर्मन तीव्र इच्छा

कोणतेही काम ' ते व्हावं ' असं कर्त्याला मनापासून वाटावं लागतं.  

अंतर्मनातील तीव्र इच्छशक्ती ते काम होण्यासाठी काम करू लागते, काम होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. 
 अडथळे दूर होतात.  मार्ग सुकर होतात. 
😊🙏

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

आत्महत्या

Anxiety, depression and suicidal tendancy या विषयावर खूप चांगले युट्यूब व्हिडिओ आहेत. 
विविध कारणांनी आपल्या शरीर, मन, बुद्धीमध्ये Chemical लोच्या झालेला असतो. 
तो ओळखणे,  त्यावर उपाय करणे आणि आनंदी राहणे अत्यंत आवश्यक आहे. 

आत्महत्या करणारा माणूस समस्येतून स्वतः सुटून जातो. 
आणि असंख्य समस्या आपल्या प्रिय / आपण ज्याचे प्रिय आहोत अशा लोकांना देऊन जातो. 

म्हणूनच आत्महत्या हा गुन्हा आहे. आत्महत्या करणारा गुन्हेगार.!

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

कर्तव्य संहिता

कर्तव्य संहिता हे केवळ वाचनालयाचे नाव नसून, कर्तव्याची जाणीव जागृत करणारी एक संकल्पना आहे.
कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि नागरिक व शेतकऱ्यांचे कर्तव्य—ही प्रशासनाची मूलभूत चतुःसूत्री आहे.
लोकप्रतिनिधींचे कर्तव्यही या व्यवस्थेतील तितकेच महत्त्वाचे अंग आहे.
अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल साधला तरच प्रशासन प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनते.
कर्तव्य हा अधिकार आणि जबाबदारी यांना जोडणारा मध्यबिंदू आहे.
आपला अधिकार समजून घेताना त्यासोबतची जबाबदारी आणि कर्तव्य जाणणे आवश्यक आहे.
कायदा, नियम, शासन निर्णय आणि न्यायनिवाडे यांचे ज्ञान कर्तव्यपूर्तीला अधिक सक्षम बनवते.
या वाचनालयातून अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी ज्ञान घेऊन आपल्या कर्तव्याची जाणीव अधिक दृढ करावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
वाचनातून ज्ञान, ज्ञानातून कर्तव्य आणि कर्तव्यातून सुशासन—हीच कर्तव्य संहितेची प्रेरणा आहे.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

अफसाना खुबसुरत मोड पे छोडणा अच्छा

वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन. उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा.

प्रशासनात आपली जागा घेण्यासाठी असंख्य लोकं आहेत. पण नात्यांसाठी आपण एकच

प्रशासनात आपली जागा घेण्यासाठी असंख्य लोकं आहेत. 
पण , 
आपण कोणाचा तरी एकुलता एक 
भाऊ/ बहीण, 
पती/ पत्नी , 
आई – बाबा , 
मुलगा – मुलगी, 
मामा, आत्या, काका, मावशी 
 वगैरे असतो. 
आपण कुणाचा तरी एकमेव मित्र सखा साथीदार असतो. 
आपण कुणाचा तरी mentor असतो... 
शिष्य असतो 
आपली जागा घेणारं अन्य कुणीही नसते. 
No one

सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. 
🎯 टार्गेट ची कामे करताना आपल्या मन बुद्धी हृदयावर प्रचंड ताण येतो.
तत्परतेने काम होण्यासाठी नियोजन,
एकाच वेळी अनेक कामं... 

वेळेत काम पूर्ण करण्यासाठी धावपळ, 

वेळेत विशिष्ट जागी पोहोचण्यासाठी गाडीचा वेग वाढतो.

रविवार, १५ मार्च, २०२६

मजूर ते प्रतिभावान

केवळ शरीराने श्रम करणारा मजूर,
शरीर आणि बुद्धीने काम करणारा कारागीर,
शरीर, बुद्धी आणि हृदय याने काम करणारा कलाकार, 
शरीर, बुद्धी, हृदय आणि मन लावून काम करणारा प्रतिभावान असतो.! 

गुरुवार, २२ मे, २०२५

legal logical and moral

कोणतेही काम legal, logical आणि moral कसोटीवर पडताळून पाहिले पाहिजे. 
त्या तीनपैकी दोन बाजूकडे कल असणारी भूमिका घ्यावी. 

सामान्यतः तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर अशा बाबतीत काम केले जाते असे माझे व्यक्तिशः निरीक्षण आहे. 

वरिष्ठ स्तरावर जाताना कायदा नियमांकडे जास्त कल असतो, तो असणे बरोबरच आहे. 

शासकीय काम खालून वर जाताना अधिक गांभीर्याने तपासले जाणे योग्य आहे. तिथे भावनिक भूमिका अडचणीची ठरू शकते. 

गाव स्तरावर legal, logical आणि moral काम करण्याची जास्त संधी असते आणि with Bonafide intention अशी संधी घेतलीही पाहिजे. 

अशा सहकार्याच्या भूमिकेतून केलेल्या कामांचे पॉइंट्स जमा होतात.  आपल्या अडचणीच्या प्रसंगी ते कामी येतात. 


तात्यांचे परिपत्रक

रविवार, २८ जुलै, २०२४

गुरु शिष्य आज्ञाधारक

एक गुरु आणि त्याचे आठ- दहा शिष्य असे अध्ययन करत गावोगावी फिरत असतात.  गुरु आणि शिष्य यांच्यात प्रबोधनाचे संवाद होत असतात.  गुरु शिष्याला सांगतो की परस्त्रीला स्पर्श करू नये, तिच्याशी वाईट बोलू नये, शिवी देऊ नये वगैरे 
आणि असंच आठ-दहा जण शिष्य पुढे पुढे जात जात असताना वाटेत एक नदी येते आणि ती नदी होडीतून पार करायची असते. 
होडीतून पलीकडे जाताना एक महिला त्या होडीत बसण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला होडीत बसायला जमत नसल्यामुळे एक शिष्य हात देतो आणि त्याच्या हाताला धरून ती महिला होडीत बसते. होडी नदीच्या पार जाते. 
 हे गुरु शिष्य पुढच्या प्रवासाला निघतात.  जाताना वाटेत एक शिष्य गुरूंच्या जवळ जाऊन कानात कुजबुजू लागतो -
 गुरुदेव आपण सर्वांना सांगितले आहेत की परस्त्रीला स्पर्श करू नये.  परंतु आपल्या ' या ' शिष्याने होडीत स्त्रीच्या हातात हात दिला.  त्याने नियम मोडला. त्याला प्रायश्चित घ्यावे लागेल अन्यथा पाप लागेल. 

गुरुदेव उत्तरले - अरे मुर्खा! त्याने धरलेला हात होडीतच सोडून दिला,  पण तू तुझ्या मेंदूत तो हात घेऊन इथपर्यंत आला आहेस.! 

शुक्रवार, २८ जून, २०२४

ताणतणाव व्यवस्थापन

ताणतणाव व्यवस्थापन - 
( ताणतणाव नष्ट करता येणं अशक्य आहे पण त्याचे व्यवस्थापन सहज शक्य आहे.) 

मा. जिल्हाधिकरी सो यांचे सूचनेप्रमाणे आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी ताणतणाव व्यवस्थापन बाबत खूप छान माहिती दिली. 

Anxiety, depression and suicidal tendancy ही मानसिक समस्या आहे. आणि याकडे समस्या म्हणून पाहण्याची जाणीव या निमित्ताने झाली. 
एखादा प्रश्न समजणे हे त्या प्रश्नाचे अर्धे उत्तर असते.! 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक दोन वर्षे किंवा एक दोन व्यक्ती खराब भेटत असतात. त्यांना take it easy पद्धतीने हाताळले पाहिजे. . . कारण आपल्याकडे अनेक चांगली वर्षे आणि व्यक्ती असतात. 

आपल्याला डिस्कनेक्ट होता आले पाहिजे. 
प्रसंगानुरूप स्वतःचे व्यक्तीत्व आणि पद वेगळं करता यावे. 

ऑफीस मधून घरी गेल्यावर आणि घरातून ऑफिस मध्ये आल्यावर. जिथे आहे तिथे १००% शरीर - मन - बुध्दीने असणे. 


 व्यक्तित्वाचा प्राधान्यक्रम 
1. Happiness आनंद 
2. मानसिक आरोग्य 
3. शारीरिक आरोग्य 
4. समाजभान
4. नातेसंबंध 
5. आर्थिक क्षमता 
असा असेल तर उत्तम.! 


- सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत ( मंगेश पाडगांवकर)
- मी हजार चिंतांनी डोके खाजवतो - तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो (संदीप खरे)
ही दोन गाणी ताणतणाव व्यवस्थापन करणारी आहेत. 


आजच्या session ने खूप काही मिळाले आहे. 

सरांचे व civil hospital अधिकारी यांचे खूप खूप आभार! 
🙏🏻
रोहीत पाठक
29.06.2024

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

म्हैस


एक म्हैस - 
खुप छान दिसते, 
आखीव रेखीव शिंगे, 
मारत नाही, 
लहान मुलं शिंगावर  बसून बिनधास्त खेळू शकतात. , 
उठ म्हटले की उठते,
बस म्हटले की बसते. 
कमी खाते, 

( फक्तं दूध देत नाही.)

बुधवार, १४ जून, २०२३

समान नागरी कायदा

समान नागरी कायदा बाबत खूप मोठ्या प्रमाणात समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूला गैरसमज आहेत. घटनेत राज्यव्यवस्थेला दिलेली मार्गदर्शक तत्व आहे. यातील कलम ४४ समान नागरी संहिता चे आहे. एकसमान नागरी संहिता सर्व धार्मिक समुदायांना लागू होण्यासाठी एक देश, एक नियम असा प्रतिध्वनित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये ‘समान नागरी संहिता’ हा शब्द स्पष्टपणे नमूद केलेला आहे. कलम ४४ म्हणते, "राज्य भारताच्या संपूर्ण भूभागात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल."▶️समान नागरी संहितामुळे आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. ▶️ सर्व फौजदारी कायद्यांत पूर्वीपासूनच सर्व धर्मियांना समान नियम आहेत. ➡️  हा असा कायदा आहे जो संपूर्ण देशासाठी एक कायदा प्रदान करेल, जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये लागू होईल जसे की,१. विवाह,२. घटस्फोट, ३. वारसा,४. दत्तक घेणे  ( सध्या या बाबी धार्मिक आधारावर भिन्न कायद्याने होत आहेत. ) समान नागरी कायद्याने त्या धार्मिक आधारावर करता येणार नाहीत. अनेक जनजातींचे समुदायात रूढी, परंपरा (विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक याबाबत) देखील वेगळ्या प्रकारे आहेत. त्यांचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. . . समान नागरी कायदा झाला पाहिजे. त्याचे डोळसपणे समर्थनीय आणि विरोधातील मुद्द्यांचे synthesis होऊनच! शुभं भवतू🙏🏻रोहीत पाठक.

रविवार, ११ जून, २०२३

तात्पुरता उपाय

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
 

शनिवार, ११ मार्च, २०२३

बरे वाईट व्यक्तीचा गुण

प्रत्येकाच्यात कमी अधिक प्रमाणात बरे वाईट गुण असतात. 
एकुणात हिशोब केल्यावर जास्त वाईटपणा सहज लक्षात येतो, तेच त्याचे व्यक्तिमत्त्व समजले जावे. 
ओढून ताणून चांगले गुण शोधणे म्हणजे झिरो ला हिरो बनवणे असते.

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

common sense

खरं,  खरे , आदर्श वगैरे काल्पनिक असते.! 
असे आदर्श पूर्वीही नव्हते, आताही नाहीत, भविष्यात देखील असण्याची शक्यता कमीच आहे. 

म्हणूनच त्यातल्या त्यात बरं निवडावे लागते, 
जनता सुज्ञ असते. कायदेपंडित नसते. 
कारण कायदा हा codified common sense असतो. 
जनतेचा common sense योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो.

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

रविवार, १७ एप्रिल, २०२२

लोकहितं मम् करणीयम्


मनसा सततं स्मरणीयं
वचसा सततं वदनीयं
लोकहितं मम करणीयम् ॥ लोकहितम् ॥

न भोगभवने रमणीयं
न च सुखशयने शयनीयम् ।
अहर्निशं जागरणीयं
लोकहितं मम करणीयम् ॥ १॥

न जातु दुःखं गणनीयं
न च निजसौख्यं मननीयम् ।
कार्यक्षेत्रे त्वरणीयं
लोकहितं मम करणीयम् ॥ २॥

दुःखसागरे तरणीयं
कष्टपर्वते चरणीयम् ।
विपत्तिविपिने भ्रमणीयं
लोकहितं मम करणीयम् ॥ ३॥

गहनारण्ये घनान्धकारे
बन्धुजना ये स्थिता गह्वरे ।
तत्र मया सञ्चरणीयं
लोकहितं मम करणीयम् ॥ ४॥

           - डाॅ श्रीधर भास्कर वर्णेकर

शनिवार, २ एप्रिल, २०२२

व्यर्थ

वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम्।
वृथा दानम् समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च॥

समुद्रामधे झालेला पाऊस व्यर्थ, भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ. श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ आणि दिवसा लावलेला दिवा पण व्यर्थ.

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

वाटचाल


आता प्रचलित असलेले देखील काही शतकांनी बदलावे लागतील. 

लोकानुनयी कल्पना ओढून ताणून मांडल्या जातात, ज्याचा प्रतिवाद करणे अशक्य असते. 
पुढील कालावधीत सध्याची मांडणी हास्यास्पद देखील ठरू शकते! 

हे असंच चालायचं..! 
निरंतर... 

आपला प्रवास सोयीचा - सुखकारक असण्यापेक्षा हितकारक असावा.

रविवार, १६ जानेवारी, २०२२

whatsapp कामकाज

Whatsapp वरील मेसेजला रिप्लाय देणे  हे एखाद्याला कार्यालयात येण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नये यासाठी मी स्वेच्छेने केलेली सोय आहे.

 तो कोणाचाही हक्क नाही. 

शासनाने दिलेले उपकरण नाही. 

कृपया त्याचा थोडक्यात लाभ घ्यावा. 

डॉक्टराकडून आपण whatsapp द्वारे उपचार घेत नाही. 

10 ₹ चा पेन, 200 ₹ टी शर्ट, 112 ₹ चे पेट्रोल  इ. साठी आपण स्वतः जात असतो. 

तद्वत,  आपल्या लाखो ₹ चे स्थावर मालमत्तेच्या संबंधी शंका समाधान होण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढून समक्ष उपस्थित रहावे. किंवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवावे.  

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

मोदी

जे जे केलं ते मनापासून ... 
दुनिया काय वाट्टेल ते बोलू देत, मला जे वाटतं / पटतं  ते शुद्ध हेतूने प्रेरित आहे. ते मी करणारच ! 
सात वर्षे दरमहा शेवटचा रविवार स. 11 वाजता  "मन की बात"  चालू आहे. 

निष्ठा , दृढता, commitment , विश्वास वगैरे.! 
❤️